गुंता

  • 4.4k
  • 1.5k

गुंता वरूण सुन्नपणे समोरच्या स्त्रीच बोलण ऐकत होता.तो खुपच गोंधळलेला होता.जे तो ऐकत होता ते जर खर असेल तर मग आजपर्यंतच त्याच आयुष्य म्हणजे फक्त आभास होता.काल पर्यंत त्याच्या आयुष्यात कोणतीही गुंतागुंत नव्हती. अगदी सरळ व सोप आयुष्य होत त्याच.पण आत्ता या क्षणी त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते.प्रश्नांचा एक गुंतवळा समोर 'आ ' वासून उभा राहिला होता. पाऊण तासापूर्वी स्वतःला माई देशपांडे म्हणवणार्या स्त्रीने त्याच्या आॅफिसमध्ये पाय ठेवला अन् त्याच विश्वच उलटपालट झाल.एका वृध्दाश्रमाच्या रौप्यमोहत्सवासाठी ती निमंत्रण द्यायला आली होती. आठ दिवसांपूर्वी वरूणची रत्नागिरी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती. राजापुरात असलेल्या ' गोकुळ ' या वृध्दाश्रमाबध्दल वरूण ने ऐकले