गीत रामायणा वरील विवेचन - 2 - अयोध्या मनुनिर्मित नगरी

  • 5.5k
  • 3.3k

लवकुशांनी राम दरबारात रामायण सांगण्यास सुरुवात केली आहे. ते सांगतात: शरयू नदीच्या काठावर अयोध्या नावाची मनू ने निर्माण केलेली विशाल नगरी स्थित आहे. (मनू हा भारतीयांचा आद्य पुरुष आहे व शतरुपा ही मनूची पत्नी असून आद्य स्त्री आहे. त्यांच्यापासूनच भारत वंशाचे लोकं निर्माण झाले.) तर ह्या अयोध्या नावाच्या अजस्त्र नगरी मध्ये एकाहून एक सुंदर अश्या इमारती, वास्तू उभ्या आहेत. दोन्ही बाजूला सुंदर वास्तू आणि त्यांच्या मध्ये समांतर असे रस्ते आहेत ज्या रस्त्यांवरून अनेक रथ हत्ती घोडे, तिथून येणारे जाणारे प्रवासी नटून थटून त्यावरून मार्गक्रमण करत असतात. ह्या अयोध्या नगरीच्या घराघरावर रत्नांची तोरणे आहेत. घर मंगलचिन्हांनी सुशोभित केलेले आहेत. ठिकठिकाणी नयनरम्य