गीत रामायणा वरील विवेचन - 3 - उगा का काळीज माझे उले?

  • 6k
  • 2.7k

सर्वथा संपन्न समृद्ध अश्या संसारात राजा दशरथ व त्यांच्या भार्यांना एकच शल्य खुपत होतं ते म्हणजे पुत्र नसणे. त्याच व्यथेत विचार करीत कौसल्या देवी आपल्या राजवाड्यातील उपवनात बसलेल्या असतात. सहज त्यांचं लक्ष फुलांनी लगडलेल्या लतिकेवर जाते आणि त्यांना विषाद वाटतो. त्यांचं मन व्याकुळ होते. त्या विचार करतात: 'पहा ह्या वेलीला सुद्धा भरभरून फुले आहेत पण माझ्या संसारवेलीवर एकही पुत्ररूपी फुल नसावं हे किती दुर्दैव आहे. आजपर्यंत कधी मनात वाईट विचार आला नव्हता,कधी कोणाचा हेवा वाटला नव्हता. एवढंच कशाला कधी दोन सवती असून त्यांच्या प्रति कधी मत्सर मला वाटला नाही पण आज ह्या फुलांनी समृद्ध अश्या वेली बघून मला खूप हेवा