हाती घेतलेले पायसाचे पात्र राजा दशरथ देवी कौसल्ये च्या हातात देऊन म्हणतात, कौसल्या देवी ह्या पायसाचे तीन समान वाटे करून आपण तीनही राण्यांनी प्राशन करावे. त्यानुसार कौसल्या देवी तीन समान वाटे करतात स्वतः घेतात व राणी सुमित्रा व राणी कैकयी ला देतात. सुमित्रा राणींना वाटते की आपल्याला कमी पायस दिलं आहे त्यामुळे त्या रुसतात आणि पायसाचे फुलपात्र बाजूला ठेवतात. राजा दशरथ, कौसल्या देवी,कैकयीदेवी त्यांना समजवतात पण त्या मान्य करण्यास तयार नसतात. तेवढ्यात एक वानरी येऊन सुमित्रा राणीच्या जवळचं फुलपात्र उचलून घेऊन जाते व स्वतः प्राशन करते ते बघून राणी सुमित्रा आणखी विलाप करू लागतात. त्यांचा विलाप बघून देवी कौसल्या आणि