चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामांचा जन्म होतो. राजा दशरथ आणि देवी कौसल्या ह्यांचं इप्सित पूर्ण होते. त्यांचे हृदयं आनंदाने उचंबळून येतात. राजवाड्यात प्रत्येकजण आनंदात उत्साहात असतो. संपूर्ण अयोध्या आनंदोत्सवात मग्न असते. हळूहळू दिसामासाने श्रीराम वाढू लागतो. कौसल्या देवींचा वेळ श्रीरामाचे लाड करण्यात,त्याला खाऊ पिऊ घालण्यात,त्याला न्हाऊ माखू घालण्यात,त्याचे कोडकौतुक करण्यात, त्याच्या बाळ लीला बघण्यात कसा निघून जातो हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. चारही बालकांच्या वावरण्याने राज प्रासादात एक चैतन्याची लहर पसरलेली असते. देवी कौसल्या,देवी सुमित्रा व देवी कैकयी चारही मुलांच्या संगोपनात रमून गेलेल्या असतात. कौसल्या देवी बाळ श्रीरामाला आपल्या मांडीवर पालथे निजवून सुगंधी तेल-उटण्याने अंघोळ घालत असतात. सावळ्या बाळ श्रीरामाचे छोटे