सुनंनं स्वतःला सासूच्या जागी ठेवावं अलिकडे न्यायालयात घटस्फोटाचे खटले दाखल होत आहेत. खटले वाढत असून निकालाच्या मानानं खटल्याची संख्या जास्त आहे. या खटल्यातील वादाचा विषय असते सासू. सासू मोठी खास्ट आहे असं कारण पुढं करीत न्यायालयात खटले दाखल होत असतात. तसं पाहता अलिकडील काळ बदललेला आहे व काही काही घरात सासवांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. पुर्वीचा काळ असा नव्हता. त्या काळात सासवा बदमाश असत असं आजच्या काळातील लोकांचं म्हणणं. परंतु त्या काळातीलही अपवादात्मक दोनचार जर सोडल्या तर काही सासवा खऱ्याच चांगल्या होत्या. मग सासवा खास्ट असतात. त्या चांगल्या नसतात असा सासवांचा इतिहास बदनाम करणारा का पुढे आला असावा?