तरुण वयातले हे क्षणच जीवनात आनंद घेऊन येतात. कारण हीच तर वेळ असते जेव्हा आपल्यावर जबाबदारीच ओझं नसत . दुनियेच्या अपेक्षा असल्या तरीही मित्रांची निर्विवाद साथ असते. भावनांची सुंदर रांगोळी असते ज्यात आपण सतत वेगवेगळे रंग भरत जातो. हे क्षणच पुढे आठवणी बनतात ज्या आयुष्यात पुन्हा परतून कधीच येत नाहीत. बालपण असो की तरुणपण प्रत्येकाची आपली एक वेगळीच मज्जा असते. स्वराने आय.आय.टी. ला नंबर लागावा म्हणून जवळपास आपलं सर्वच सॅक्रीफाइस केलं होतं पण आता तिने आपलं स्वप्न पूर्ण करायला एक पाऊल पुढे टाकलं. आता जगत असताना तिला आपल्या प्रत्येक इच्छा मारून जगायची गरज नव्हती. ती आपलं तरुणपण सुद्धा एन्जॉय करत