भाग्य दिले तू मला - भाग ४

  • 6.8k
  • 4.9k

स्वयमच्या निस्वार्थी वागण्याने स्वराच्या मनात त्याच्याविषयी एक कोपरा निर्माण झाला होता. ती पूजाच्या बोलण्यावर गालातल्या गालात हसत होती तर पूजा तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून हसत होती. स्वराला हे आपल्यासोबत नक्की काय होतंय ते माहिती नव्हत पण तिला ते सर्व आवडून गेलं होतं. दुसऱ्या दिवसापासून अगदी सर्व काही बदललं होत. स्वराला तयार व्हायला फार वेळ लागत नसे पण ती आज स्वतःला वारंवार आरशात पाहत होती. पहिल्या प्रेमाचे ते निरागस भाव सहज तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते. पूजाला तिच्या अशा वागण्याचा राग यायचा पण तिला इतकं आनंदी बघून पूजा फारच खुश होती. तयारी करून झाल्यावर दोघेही कॉलेजला पोहोचल्या. गेटपासून दोघींच्याही गप्पा सुरु झाल्या