भाग्य दिले तू मला - भाग ५

  • 9.1k
  • 7.1k

वेडावले मन माझे क्षणभर तुला पाहण्या होतोय भावनांचा गुंता बोल ना वेड्या मना ! गुंतण्यात तुझ्या मी माझे भाग्यच जाणिले वाट पाहता तू मिळे ना मी अधीर अशी जाहले का मजवरी तरी माझे भान उरले आज नाही होतोय भावनांचा गुंता बोल ना वेड्या मना ! मी निशाचर रागिणी स्वप्न - स्वप्नांत रमनारी पिऊन प्रेमजल पिरमाचे बेधुंद वाऱ्याशी बोलणारी कैद केलेस कधीच तू मला सोड ना हा अबोला होतोय भावनांचा गुंता बोल ना वेड्या मना ! नयनी तुझ्या काल मी पाहिले तुला स्पष्ट हरविले तुझ्यात मी अन जगले क्षणभर तुझे स्वप्न तू लाजेचा प्याला हा आता तरी सोड ना होतोय भावनांचा