भाग्य दिले तू मला - भाग १४

  • 6k
  • 4.4k

स्वरा-राजचा विषय आज कॉलेजचा हॉट मुद्दा झाला होता. जो तो कुणी फक्त त्यावरच चर्चा करत होता. राज हा थोडा घमंडी असल्याने भरपूर लोक जे घडल त्याने खुश होते. त्यांच्यासाठी आजचा दिवस तर खूप आनंदाचा होता तर दुसरा एक वर्ग होता जो स्वराची काळजी करत होता. राजला राजनैतिक पार्श्वभूमी लाभली असल्याने तो त्याचा कायमच गैरवापर करत आला होता. धमक्या देणे, गुंडकडून मारहाण करणे असेच बरेच किस्से त्याच्याकडून ऐकण्यात आले होते शिवाय प्रॉपर्टीचा बिजनेस असल्याने कित्येक लोकांना धमकावून त्यांने स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी केल्या होत्या. तो कोणत्या वेळी काय काय करेल हे त्याचं त्यालाच माहिती नव्हतं म्हणून आज स्वराची सर्वाना काळजी वाटत होती