भाग्य दिले तू मला - भाग २८

  • 3.5k
  • 1.9k

बेखबर थी मै दुनिया मे हो रही साजिश से तुम चैन ले गये मेरा मै जी रही हु मजबुरी से आयुष्यात बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला नकोशा असतात. ज्याचा आपल्याला तिरस्कार असतो पण नशीब त्याच गोष्टी आपल्याला स्वीकारायला भाग पाडत. त्या गोष्टींबद्दल आपले विचार तर बदलत नाहीत पण आपण हळूहळू त्या स्वीकारत जातो हे खरं. मग त्या घट्ट मनात कुठेतरी दाबल्या जातात आणि आपण जगाला हवा असणारा आनंदी चेहरा सर्वाना दाखवू लागतो. जे आवडत, जे आपण डीजर्व करतो ते न मिळणे आणि जे आवडत नाही तोच आयुष्याचा भाग होणे कदाचित ह्यालाच भाग्य म्हणतात आणि भाग्याच्या खेळातून कुणीच वाचला नाही.