भाग्य दिले तू मला - भाग २९

  • 5.3k
  • 3.6k

खामोशसे कुछ सपने है खामोशसे कुछ नगमे रेह गये वो अधुरे जिते जिते ही मुझमे आयुष्याला सुंदर बनवायला हवं असत ते सुंदर हसू. आपल्याकडे जर सुंदर हसू असेल तर कदाचित आयुष्यात आलेल्या समस्यांनादेखील आपण दूर ठेवू शकतो. एक वेळ अशी येते की ते सुंदर हसू बघून समस्यांना देखील आपल्या आयुष्यात राहणे लाजिरवाणे वाटते आणि त्या कायमच्या दूर निघून जातात. जीवन जगण्याचा हाच सर्वात सुंदर उपाय आहे. समस्यां हा आयुष्याचा भाग आहे. आपण जोपर्यंत त्यांना आपल्यावर हावी होऊ देऊ तोपर्यंत त्या वरचढ ठरतील आणि एकदाकी आपण त्यांचं महत्त्व कमी करतो तेव्हा त्या आयुष्यात तर राहतात पण कदाचित त्यांचा प्रभाव नाहीसा होता.