भाग्य दिले तू मला - भाग ३३

  • 5.2k
  • 3.5k

आंखोसे आशिकी का इजहार कर दिया बिन बोले तुझे तेरा इमान दे दिया अगर पाना है सुकून तो चले आना मेरे दर पे मै तेरा जवाब हु तुझे हर दर्द से आझाद कर दूंगा स्वरा केबिनमध्ये पोहोचली तेव्हापासून स्वराच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणभर कमी झाला नव्हता आणि तिला बघून अन्वयच्या चेहऱ्यावरचा आनंदसुद्धा कमी होण्याचं नाव घेईना. अन्वयला स्वप्नांतही वाटलं नव्हतं की त्याला स्वराला इतक्या सहज, पहिल्याच दिवशी बंधनातून मुक्त करायला पाऊल टाकता येईल पण नशिबाने त्याला संधी दिली आणि परिणाम असा झाला की स्वराच्या चेहऱ्यावरच हसू आज काही केल्या जात नव्हत. स्वरा किती तरी दिवसाने ह्या वातावरणात मुक्त श्वास घेत होती