भाग्य दिले तू मला - भाग ३४

  • 6k
  • 4k

ताउम्र देखी है जमाणे की साजिशे खयाल आया क्यू ना मै भी करलु..?? जमाणे से छुपते-छुपातेही सही क्यू ना तुझसे मै प्यार करलु..?? स्वरा अन्वयच बोलणं ऐकून चिडली होती तर तिला चिडलेलं बघून अन्वय हसत होता. अन्वयने आज पहिल्यांदा तीच हे रूप बघितलं आणि तो स्वतःला हसण्यापासून सावरू शकला नाही. ती केबिनमध्ये त्याला शिव्या देत होती तर तो तिच्या चेहऱ्यावरचे नटखट भाव बघून हसत होता. अन्वयने तिच्यात अस काय बघितलं होत माहिती नाही पण त्याला ती जगावेगळी वाटली होती. तिच्यात जे कुणी पाहू शकलं नव्हतं ते अन्वयने पाहिलं आणि अगदी काहीच दिवसात तो तिच्याकडे आकर्षिल्या जाऊ लागला. दिवसरात्र त्याला तीच