उसने कुछ केह दि ऐसी बात के दिलं बेचारा पिघल गया सूनता नही था वो किसिकी पेहले देख लो वो आज खुद बेहक गया आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्रेमाने साध्य होत नाही.कधीकधी झोपेतून उठवण्यासाठी खडे बोल सूनवावे लागतात. नेमकं तेच काम अन्वयने केलं होतं आणि स्वरा खडबडून जागी झाली. खर तर परिस्थिती आजही तीच होती पण अन्वयने तिला जगण्याचा दृष्टिकोन दिला. ती त्याला काही बोलली नाही पण त्याच्या प्रत्येक शब्दाची जादू तिच्यावर झाली होती. आज ती घरी पोहोचली तेव्हाही त्याचा प्रत्येक शब्द तिच्या मनात घुमू लागला होता पण ह्यावेळी तिला त्याचा त्रास होत नव्हता उलट ती आनंदी होती. कितीतरी दिवसाने तिला