भाग्य दिले तू मला - भाग ४५

  • 2.3k
  • 1.5k

तेरे इस चेहरे को देखकर वो चेहरा याद आ गया ख्वाबो मे देखते- देखते वो चेहरा हकीकत बन गया दुख कारणाशिवाय येत नाही तर आनंद वाटायला कारण लागत नाही. अगदी छोट्या - छोट्या गोष्टी जगताना सुद्धा आनंद साजरा करता येतो. खर तर हेच गणित आहे जीवनाच. स्वराच्या आयुष्यात चांगली मानस खूप आली पण तिच्या संघर्षासमोर, तिच्या प्रश्नासमोर उत्तर देण्याची कुणाची ऐपत नव्हती की कुणाच वय नव्हतं. साहजिकच जो प्रश्न फक्त स्वरा अनुभवू शकत होती तितक्याच संवेदशील मनाने तिला कुणीच समजू घेऊ शकलं नसत म्हणूनच कदाचित तिच्या आयुष्यात येणाऱ्या लोकांनी तिला फक्त सकारात्मक राहायला सांगितल आणि तिची कायम स्तुती करत राहिले.