खौफ की रात - भाग २६

  • 3.3k
  • 1.6k

भाग २६ सावकार आणी त्याचे गावगुंड बाल्याच्या फसवी आवाजाच्या दिशेने निघाले होते. सावकार पुढे चालत होता ..तर त्याच्या मागून ते चारजण स्ट्रेचरवर झोपलेल्या म्हातारीच प्रेत तिरडीसारख खांद्यावर घेऊन चालत घेऊन निघाले होते. आडदांड देहाचे , माजलेले ते राकीट गड़ी दिवसाला दोन कोंबडे खायचे..त्यांची ती ताकद किती असेल ते तुम्हीच ठरवा ? स्ट्रेचरवर म्हातारीच झोपलेल प्रेत चौघांनी कापसाच्या पोत्यासारख उचलून धरल होत..आणी सावकाराच्या मागून आरामात चालत होते. " ए फोन लाव त्या रांxच्याला ! दहा मिंट झाली चालतोय आपण ..! आवाज देऊन कुठ झक मारत बसलाय.. कुणास ठावूक? !" सावकार त्रासिक स्वरात म्हंणाला. त्या आवाजात जरासा राग सुद्धा होता. " जी-