खौफ की रात - भाग २८ आंतिम

  • 3.6k
  • 1.5k

भाग २८ आंतिम मागील भागात काय झालं होत ? दोन पिशच्छांनी एक मळलेली दोरी आणली. निळ्या पाठमोरा वळळा..वळताच त्याने पुढच्या खिशात हात घातला..- तो काचेचा तुकडा खरच त्याने उचलून घेतल ते बरच केल होत.. तो तुकडा त्याने पुढच्या खिशातून काढुन हातात घेतला..- लालसर मशालिंच्या मंद प्रकाशात जरास अंधुक दिसत होत - ह्याच त्याला फायदा झाला होता, होत होता. तो पाठमोरा वळला - काचेचा तुकडा मुठीत गच्च धरला होता. त्याने पाठ लाकडाला टेकवली- तसे दोन जणांनी लागलीच दोरीमार्फत त्याला लाकडाला बांधायला सुरुवात केली. सर्व बाजुंनी त्याला दोरीने बांधून ठेवल.. निळ्याच्या दोन्ही बाजुंना पिशाच्छ उभे होते. समोर सावकाराच्या देहात उभी लालसटवी उभी