एव्हाना राजा दशरथ यांच्याकडे श्रीराम व देवी सीता यांचा स्वयंवर सोहळा संपन्न झाला हा निरोप जातो. राजा दशरथ व त्यांच्या तिन्ही राण्यांना व भरत शत्रुघ्न यांना मिथिलापुरीत येण्याचे राजा जनक आमंत्रण देतात. कुलगुरू वसिष्ठ व विश्वामित्र यांच्या मार्गदर्शनानुसार असे ठरते की राजा जनकाच्या उर्वरित तिन्ही कन्यांचे (मुळात राजा जनकाच्या दोनच कन्या होत्या एक सीता जी भूमीतून उत्पन्न झाली होती व दुसरी उर्मिला आणि जनक राजाचा जो चुलत भाऊ होता कुशध्वज त्याच्या दोन कन्या होत्या मांडवी व श्रुतकीर्ती. परंतु भावाच्या मुली म्हणजे आपल्याच मुलीप्रमाणे असतात ह्या न्यायाने पुराणात मांडवी व श्रुतकीर्ती सुद्धा जनक राजाच्या पुत्री म्हणून ओळखल्या जातात. आणि राजा जनक