गीत रामायणा वरील विवेचन - 14 - मोडू नका वचनास नाथा

  • 3.1k
  • 1.3k

राजा दशरथांनी जेव्हा श्रीरामांस राज्यपदी बसवण्याचा निर्णय घेतला तेव्हा भरत व शत्रुघ्न आपल्या आजोळी गेले होते. ते नसताना राज्याभिषेक करणे हे देवी कैकयी च्या दासीला म्हणजेच मंथरेला व कैकयी ला सुद्धा खटकले. नक्की काहीतरी ह्यात गोम आहे असे त्या दोघींना वाटू लागले. मंथरेने कैकयीच्या डोक्यात गैरसमज भरून दिला. देवी कौसल्या ह्याच राजे दशरथांना प्रिय असून श्रीराम च त्यांचा प्रिय पुत्र आहे. म्हणूनच आज भरत नसताना श्रीरामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. उद्या राम राजा झाला की कौसल्या देवी राज माता होतील मग तुला आणि तुझ्या मुलाला काहीहि महत्व राहणार नाही. असे मंथरेने कैकयीचे मन कलुषित करून टाकलं. मग आता मी काय