झोका - भाग 3

  • 8.5k
  • 5.7k

पुन्हा एकदा फाटक वाजलं. "कोण आलं पहा बरं गुंजा! ",सुधा म्हणाली"हा बगते!",असं म्हणून गुंजा बाहेर आली, फाटकाजवळ खंडू उभा होता, त्याच्याजवळ जाऊन गुंजा म्हणाली," इकडं कशे आलं धनी, काई काम हाय काय?"तिच्या कानाजवळ तोंड नेऊन खंडू तिच्या कानात काहीतरी पुटपुटला, ते ऐकून तिने झोक्याकडे विस्फारल्या नजरेने बघत तोंडाला हात लावला,"या बया! खरं सांगतासा की काय?""सोळा आने खरं हाय! हे घे ",असं म्हणून त्याने एक पिशवी तिच्या हातात दिली."हे काय हाय?",गुंजा"हे मंतारलेलं पीठ हाय", असं म्हणून त्याने परत एकदा तिच्या कानात काहीतरी सांगितलं आणि वापस जाताना तो म्हणाला," ध्यान ठिउन करजो बरं मी जे सांगतलं ते"गुंजा एकदा झोक्याकडे आणि एकदा पिशवी