झोका - 5 - (अंतिम)

  • 8.5k
  • 4.6k

खंडूचा मोठ्ठा आवाज ऐकून पळतच गुंजा बाहेर आली आणि त्यामागून सुधाही आली. त्यांनी बघितलं तर खंडू दहा फुटावर उताणा पडला होता. गुंजा धावतच त्याच्या जवळ गेली. त्याने कमरेला हात लावला होता,त्याच्या हाताचे कोपरे खरचटले होते."काय झालं धनी, अशे कशे पडले तुमी हितं",गुंजा त्याला उठण्यासाठी आधार देत म्हणाली.पण खंडू काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. सुधाने आतून पटकन त्याला पाणी आणून दिले. त्याने थोडं पाणी पिलं आणि व्हरांड्यात येऊन भिंतीला टेकून तो बसून राहिला. इतक्यात सुधा,गुंजा आणि खंडू चे लक्ष झोक्याभोवती पसरवल्या पिठाकडे गेलं, त्या पिठावर पावलं उमटत होते, जसजसे पिठावर पावलं उमटत होते तसतसे ते पीठ काळे ठिक्कर पडत होते. ते पावलं