भाग्य दिले तू मला - भाग ६५

  • 3.6k
  • 2.4k

ये लम्हा सजा कर रखं लु ये वादे याद कर लु आओगे जीस दिन तुम मै इस जहा को नजरअंदाज कर दु... पुन्हा एक सुंदर दिवस. स्वरालां आज पुन्हा एकदा नटायची इच्छा झाली. त्यामुळे तिच्या आवडत्या कलरचा म्हणजेच व्हाइट सलवार कुर्ता घालून ती लवकरच तयारी झाली. तो ड्रेस फुल्ल स्लेव्हचा होता. तिने आज सकाळी- सकाळीच उठून केस धुवून काढले म्हणून तिचे केसही आज सिल्की सिल्की जाणवत होते. तिने आज केसांना बांधले सुद्धा नाही. हातात निळ्या कलरच्या बेल्टची घड्याळ घातली आणि सॅंडल घालून ती ऑफिसला निघाली. आज स्वरा खूपच सुंदर दिसत होती. शांततेचा तो व्हाइट कलर, शांत स्वरावर आज उठून दिसत