भाग्य दिले तू मला - भाग ६६

  • 3.8k
  • 2.4k

अगर लफजो से प्यार बया होता तो तेरे शायरी बन जाते फिरते रेहते लोगो की जुबा पर हम तो तेरे आशिकी केहलाते!! स्वरा तिचा मॅसेज बघून क्षणभर हसली आणि दोघेही समोर चालू लागले. तीच हृदय आज एक क्षण धडधड करायचं थांबल नव्हतं. तिची नजर सतत त्याच्यावर होती..बोलायला ओठ आतुर होते पण शब्द निघत नव्हते आणि तिच्या मनात आलं,"अन्वय सर माझं तुमच्यावर प्रेम आहे. खूप प्रेम आहे. मला तुमचं आयुष्य बनवणार?" ते वाक्य मनातच होत. आज ते बाहेर येणार होत का?? दोघेही चालत होते. अन्वय समोर बघत होता तर स्वराची नजर अधून-मधून त्याच्यावर जात होती. तो आजही खूपच सुंदर दिसत होता