भाग्य दिले तू मला - भाग ७३

  • 3.5k
  • 2.2k

खो जाऊ तेरे प्यार मे बेशुमार मै प्यार करू आझाद हो जाऊ तकलिफोसे सजदे तेरे मै सर झुकाऊ.. अन्वयने अगदी पहिल्याच दिवशी तिला स्वप्न बघायला लावली होती. त्याच्या स्वभावाची ती आधीच फॅन होती पण त्याचा हा रोमँटिक अंदाज बघून स्वराच्या चेहऱ्यावरच हसू गायब झालं नव्हतं. कदाचित ह्याच गोष्टींमुळे स्वराने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. हळुहळु स्वराच्या लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले होते आणि स्वरा नवीन- नवीन स्वप्नांत हरवू लागली होती. अशी स्वप्न ज्यावर तिने कधीतरी बंधने घातली होती पण तो येताच ती आता आपोआप नाहीशी झाली. तीच मन स्वतःच नव्याने स्वप्न बघायला तयार झालं होतं, त्याच्यासोबत आयुष्य घालवायला तासंतास वाट