भाग्य दिले तू मला - भाग ७८

  • 3.1k
  • 2k

हर एक सुबहँ मेरी जिंदगी की तेरी हसी मे गुम हो जाये कुछ ना बचे मेरा मुझमे तुझसेही मेरी पेहचान बन जाये.... पुन्हा एक सुंदर सकाळ स्वरा- अन्वयच्या आयुष्यातील. दोघेही सकाळी- सकाळी फिरायला निघालेले. स्वरा कालप्रमाणेच अन्वयकडे बघत होती पण आज परिस्थिती जरा वेगळी होती. लोक स्वराला विचित्र नजरेने बघत होते तरीही अन्वय शांतपणे त्यांना बघत होता आणि गंमत म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर आज सुंदर हसू होत. कालची ती चिडचिड, तो त्रास आज त्याच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नव्हता म्हणून स्वरा आज त्याला बघून विचारात पडली होती. तिला नक्की कळत नव्हतं ह्या काही तासात अस काय झालं की अन्वयचे लोकांप्रती नजर बदलली