भाग्य दिले तू मला - भाग ८०

  • 3.1k
  • 2k

मायने बदल गये खूबसुरती के इस्तेमाल जब आयने का हुआ गोरी चमडी के दिवाने हुये सभी काले रंगने मेरा सब कुछ छिन लिया... सकाळची वेळ होती. ते नेहमीप्रमाणे फिरायला निघाले होते. सुरुवातीला सकाळी सोबत फिरायचं आणि मग दिवसभर कामात बिजी व्हायचं हे आता दोघांच ठरलेल होत त्यामुळे आजही शेड्युलमध्ये काहीच बदल झाला नव्हता. अन्वय-स्वरा सोबत जात होता. लोकांच्या नजरा सेम तशाच होत्या पण त्याने आता स्वतात बदल केला होता. कदाचित स्वराला सर्व सहन करताना बघून त्याच्यातही हिम्मत जागी झाली होती म्हणून त्यानेही लोकांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. काहीच क्षणात ते त्या चहा वाल्याकडे पोहोचले. स्वराला घरी जाऊन चहा बनवावा