भाग्य दिले तू मला - भाग ९६

  • 3.5k
  • 2.1k

पलभरमे बदल जाता है सपनो की आशिया कुछ ख्वाब हसाते है कुछ दिखाते है आयना... अन्वय सर्वाना शांत करून बाहेर गेला होता. तो जाताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता पण तो दुपारी येतो सांगून गेला आणि सायंकाळ झाली तरीही परतला नव्हता. अन्वयकडे मोबाइल नसल्याने त्याला कॉलही करता येणे शक्य नव्हते. तिने दिवस कसातरी काढला होता पण जसजशी सायंकाळ होऊ लागली तीच मन आणखीच घाबरू लागल होत. अन्वय वरून जरी शांत वाटत असला तरीही तो तुटल्यावर कसा वागू शकतो हे एका रात्री तिने बघितलं होत. तो वरून हसताना जाणवत होता तरीही आई वडिलांना दुखवल्याच गिल्ट त्याला नक्कीच वाटत असणार हे स्वराला जाणवत