भाग्य दिले तू मला - भाग ९७

  • 1.6k
  • 954

रेह जाते है कदमोके निशाण युही अकेली राहो पर लोग बदलते रेह जायेंगे पर जो ना बदले वो हम है... ती सकाळची वेळ होती. स्वरा बाहेर जाऊन बसली तर अन्वय फाइल घेऊन मध्ये आला होता. आई जरा निवांत टेकून होती. ती कसल्यातरी विचारात हरवली होती की अन्वय फाइलकडे बघत म्हणाला," मातोश्री गुड न्युज, सर्व रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत. इनर इंजरी नाहीत काहीच पण वरचे घाव भरायला ३-४ महिने जातील आणि जमलं तर डॉक्टर आज सुट्टी पण देतील तुम्हाला. सो आता तुमची काळजी जाईल." अन्वय फाइलमध्ये बघून बोलत होता तर आईने त्याच्याकडे कानाडोळा केला. त्याला जाणवलं की आई आपल्याशी बोलत नाहीये म्हणून