भाग्य दिले तू मला - भाग ९८

  • 3.3k
  • 1.9k

हर ख्वाहिश पुरी नही होती कुछ ख्वाहिशे सांसे छिन लेती है वक्त रेहतेही ऐतबार किया करो वरणा सांसे दिलं पर बोझ बन जाती है... एका मनमोहक सकाळीची सुरुवात कुणाच्या तरी गोड आवाजाच्या आरतीने सुरू झाली आणि आईचे डोळे पटकन उघडले. त्या आवाजात इतका गोडवेपणा, कारुण्यता होती की सकाळी-सकाळीच आईच्या मनाला समाधान मिळू लागल. आज खूप दिवसाने पहिला असा दिवस होता जेव्हा आईची सुरुवात पूजा न करताच झाली होती. तो आवाज त्यांनी पहिल्यांदा ऐकला होता म्हणून कुणाचा असेल ह्याचा अंदाजा त्यांना लागत नव्हता तेवढ्यात अन्वयचे बाबा मध्ये आले आणि अन्वयच्या आईने क्षणात विचारले," आपली निहारिका इतकी सुंदर गातेय? मला तर नव्हतं