भाग्य दिले तू मला - भाग ९९

  • 3.2k
  • 1.8k

छोटीसी है ये दुनिया कभी तो तुमपे आकर रुकेगी जो तुमने दिया है सबको वो तुमको भी जरूर लौटायेगी... पाहता-पाहता जवळपास एक दोन महिन्याचा कालावधी निघून गेला होता. आईच्या तब्येतीमध्ये बरीच सुधारणा झाली होती पण त्यांना अजूनही चालता येत नव्हते तर इकडे स्वरा त्यांचं मन शांतपणे जिंकत चालली होती पण ह्यावेळी ती स्वार्थी नव्हती. अन्वय सोबत लग्न करणे हा स्वार्थ तिने जगाच्या विचाराच्या पलीकडे जाऊन स्वीकारला होता पण इथे आल्यावर समजलं की हाच स्वार्थ एका आईला मुलापासून दूर करतोय म्हणून तिने कदाचित त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ती आपले काही सुंदर आणि शेवटचे क्षण त्याच्या कुटुंबासोबत घालवू लागली.