भाग्य दिले तू मला - भाग १०४ - अंतिम भाग

  • 3.9k
  • 2k

हौसला दो किसीं की तुटती हुयी उम्मीदो को सहारा दो किसीं के थकते हुये कदमो को बेहद आसान है किसीं को बाते सुनाना अगर है दुनिया के विचारो से लढणे की हिम्मत तो उसे संघर्ष मे साथ दो..... सकाळचे ११ वाजत आलेले. थेम्स नदी काठावर वसलेले सुंदर शहर लंडन. अन्वय केव्हापासून हॉस्पिटलमध्ये इकडून तिकडे चकरा मारत होता. अन्वय सोबत आई होत्या, त्यांचीही काहीशी अशीच स्थिती झाली होती पण त्यांनी स्वतःच्या मनाला आवर घातला होता. दोघांनाही केव्हा एकदा डॉक्टर येतात ह्याची चिंता लागली होती. गेले काही तास अन्वयने वाट बघितली होती पण आता वेळ जवळ येऊ लागली आणि अन्वयला एक-एक सेकंद