दिशाभूल

  • 4.9k
  • 1.6k

अर्जुन कवठेकर आपला मित्र गौरेश निमकरसोबत लिंबू सरबत पीत बसला होता, इतक्यात त्याचे बाबा संदेश कवठेकर तिथे आले व म्हणाले, “अर्जुन, घरी चल.” अर्जुन आपल्या बाबांसोबत आपल्या घरी गेला तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. अर्जुनची आई ईशा कॉलेजातून घरी आली व दमून सोफ्यावर बसली. अर्जुनला त्याच्या आईला नवीन सायकल घेऊन देण्याविषयी विचारायचे होते. अर्जुन पंधरा वर्षाचा मुलगा होता. नुकतीच त्याची नववीची परीक्षा झाली होती. अर्जुनने आईला विचारले, “आई, ह्यावर्षी तू मला नवीन सायकल घेऊन देशील का? आई म्हणाली, “तुझ्या जुन्या सायकलचे काय झाले?”. अर्जुन म्हणाला, “त्या सायकलची चेन तुटली आहे गं.” अर्जुनची आई यावर काहीच बोलली नाही व स्वयंपाकघरात निघून