गीत रामायणा वरील विवेचन - 20 - या इथे लक्ष्मणा बांध कुटी

  • 3.3k
  • 1.3k

निषाद राजा ने श्रीराम,जानकीदेवी व लक्ष्मण यांना गंगा पार करून पैलतीरी पोचवले. नावेतून खाली उतरल्यावर श्रीरामांना निषाद राजाला काहीतरी भेट द्यावी असे वाटले पण त्यांच्या गळ्यात जानव्या शिवाय काहीच नव्हते. सगळे आभूषणे त्यांनी राजवाडा सोडतानाच दान केले होते. एक अंगठी सुद्धा त्यांच्या बोटात नव्हती. लक्ष्मणाची सुद्धा हीच अवस्था होती त्यामुळे श्रीरामांना संकोचल्या सारखे झाले. श्रीरामांची ही अवस्था जानकी देवींनी अचूक ओळखली त्यांनी त्यांच्या बोटातील एकमेव अंगठी काढून श्रीरामांना निषाद राजाला देण्यास दिली. श्रीरामांनी निषाद राजाला ती अंगठी देत म्हंटल," निषादराज आपल्या आदरातिथ्याने तसेच आपल्या इथवर केलेल्या मदतीमुळे आम्ही गंगा नदी पार करू शकलो त्या बद्दल माझ्या कडून आपल्याला ही छोटी