गीत रामायणा वरील विवेचन - 21 - बोलले मज इतुके राम

  • 1.4k
  • 591

लक्ष्मणाने काष्ठ शाखा पाने गोळा करून एक उत्तम पर्ण कुटी बांधली. एका शुभ मुहूर्तावर तेथील जवळ राहणाऱ्या आश्रमातील ऋषींच्या साक्षीने श्रीरामांनी त्या पर्ण कुटीची वास्तू शांती करून घेतली व ते तिघेही त्या कुटीत प्रवेशले. इकडे मंत्री सुमंत आता अयोध्येत राजप्रसादात पोचले होते. राजा दशरथांना कसे सांगावे की मी श्रीरामांना घेऊन येऊ शकलो नाही ह्या विचारात ते असताना त्यांना राजा दशरथा चा निरोप येतो. मोठ्या जड अंतकरणाने ते दशरथ राजाला सामोरे जातात. "ये सुमंता! आसनस्थ हो! श्रीरामांना घेऊन तू आलेला दिसत नाही. तेथे काय घडलं? श्रीरामाला गंगा स्नान करून परत आयोध्येस आण असे मी तुला सांगितले होते त्याचे काय झाले? रामाने