सायलेन्स प्लीज - प्रकरण 5

  • 5.1k
  • 3.4k

प्रकरण 5 विहंग आणि त्याच्या भावी पत्नीला विमान तळावर सोडून पाणिनी पुन्हा आर्या च्या घरी तिच्या खोलीत आला.तिने पाणिनी कडून सर्व इत्यंभूत माहिती काढून घेतली. “ तू काय काय केलंस?” पाणिनी म्हणाला . “ मी भुकेने व्याकुळ झाले होते.त्यामुळे मी हळूचकन मागील दाराने घरा बाहेर पडले. टॅक्सी केली आणि बाहेर जाऊन हॉटेल मधे मस्त खावून आले. येताना मात्र लपत छपत न येता राजमार्गाने आले आणि सांगून टाकल सगळ्यांना की मी खांडवा वरून बस ने अत्ताच आले म्हणून.” “ तुमच्या खान सम्याने , बल्लव ने मला पकडण्याचा प्रयत्न केला.माझा कॉफीचा रिकामा कप त्याला हवा होता म्हणून अचानक तो तुझ्या खोलीपाशी आला