गीत रामायणा वरील विवेचन - 28 - सूड घे त्याचा,लंकापती

  • 1.5k
  • 549

प्रतिशोधाच्या अग्नीत जळत शूर्पणखा तिच्या खर व दूषण ह्या भावांकडे राम लक्ष्मणाची तक्रार घेऊन जाते. बहिणीची अशी अवस्था पाहून खर दूषण चवताळून उठतात. ते चौदा हजार सैन्यासह श्रीरामांना सामोरे जातात. "कुठेय तो राम? आमच्या भगिनीची अशी अवस्था करणारा! माझ्या पुढ्यात तर ये! चांगली अद्दल घडवतो तुला!",खर-दूषण म्हणाले. "दादा! बाहेर कोणा दैत्यांचा आवाज येतोय! मी आत्ता जाऊन त्यांचा समाचार घेऊन येतो.",लक्ष्मण तावातावाने म्हणतात. "लक्ष्मणा! त्यांनी मला संबोधले आहे ह्याचा अर्थ त्यांना माझ्याशी युद्ध करायचे आहे. त्यामुळे तू इथेच थांब मी बघून येतो.",असे म्हणून श्रीराम पर्णकुटी च्या बाहेर येतात. खर-दूषण युद्धयाच्या पवित्र्यातच असतात. "तूच का राम! तुला काय वाटलं? तू आमच्या बहिणीशी