सायलेन्स प्लीज - प्रकरण 9

  • 4.8k
  • 2.8k

प्रकरण 9 पाणिनी त्याच्या केबिन मधे येरझाऱ्या घालत होता.ओजस ने पोलिसांकडून गुप्त पणे तपासाच्या प्रगती विषयी माहिती मिळवली होती. “अत्ता पर्यंत तरी, त्याचं झोपेत चालणे हा तुझ्या बचावाचा एकमेव मुद्दा आहे असं दिसतंय.” ओजस म्हणाला. “ चाकूच्या मुठीवर कोणाचेच ठसे नाही मिळाले.पण दुर्वास मात्र शपथेवर सांगतोय की त्याने विहंग खोपकर ला च पाहिलंय रात्री फिरताना.आणि चंद्राच्या उजेडात स्पष्टपणे.मला असं समजलंय की अगदी पहिल्यांदा दुर्वास ने केलेल्या वर्णना नुसार त्याने फक्त एक आकृती घरा बाहेर झोपेत फिरताना पाहिली होती. आता त्याचं म्हणणं आहे की ती आकृती म्हणजे विहंग च होता.” ओजस पुढे म्हणाला, “ आणि हे झोपेत चालणाऱ्या व्यक्तीचे काम आहे