भोगी

  • 1.4k
  • 455

संक्रातीचा सण म्हणजेच उत्सवाची पर्वणीच... सर्व सुवासिनी स्त्रिया या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात... संक्रांत म्हणलं की सौभाग्य अलंकार याचा दिवस....भोगीची भाजी म्हटलं की आठवते ती मसाल्यातील सर्व प्रकारच्या मिक्स भाज्यांची भाजी.. त्यासोबत चुलीवर भाजलेल्या तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरी... खरंच आपली संस्कृती म्हणजेच एक अमूल्य असा ठेवा आहे... प्रत्येक सणाचे काही ना काही वैशिष्ट्य तर आहेच पण आरोग्य दायी असे प्रत्येकाचे स्वरूप आहे... प्रत्येक सणाचा काहीना काही ऐतिहासिक अर्थ असतो आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत आलेल्या प्रत्येक सणाला तितकेच महत्त्व आहे...संक्रांतीच्या आदल्या दिवशीच येते ती म्हणजे भोगी... या भोगीच्या दिवशी देवाची पूजा करून त्यांना भोगीच्या भाजीचा नैवेद्य दाखवला