हिंमत व आत्मविश्वास या एकाच नाण्याच्या बाजू? हिंमत अशी गोष्ट आहे की माणसाला जगणं शिकवते संकटावर मात करणं शिकवते. ती आपल्या मनात आत्मविश्वास निर्माण करते आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्याकडून कोणत्याही स्वरुपाचं कठीणात कठीण कार्य घडवून आणते. म्हणतात की ज्याच्यामध्ये हिंमत असेल तर तोच खरा मर्द. मर्द........मर्द याचा अर्थ माणूस नाही. मर्द याचा अर्थ पुरुषार्थ. ज्याला जीवनाला वा जगण्याला रंगत आणणे असं म्हणता येईल. अशी जीवनाला रंगत आजच्या काळात स्रिया देखील आणू शकतात. मग त्या मर्द नाहीत का? त्याही मर्दच असतात. म्हणूनच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई बाबत म्हटलं जातं की खुब लडी मर्दानी वह तो झाशी वाली रानी थी आणि ते