अंगद शिष्टाई - भाग २

  • 5.3k
  • 3k

हे अंगदाचे मर्मभेदक असे बोलणे ऐकून रावण स्वत: बोलला. तू राजवाड्याच्या दरवाजाच्या मार्गाने न येता दुसऱ्याच मार्गाने आलास यामुळे आम्ही मौन राहिलो होतो. असे चुकीच्या मार्गाने आलेल्याशि संभाषण करणे आम्हाला दुषणास्पद आहे. अंगदाला हे बोलणे ऐकून हसू आले व तो म्हणाला समोरच्या व्यक्तिचे अवगुण तुम्हाला दिसतात पण स्वत:चे अवगुण दिसत नाहीत. खरे तर चोरी करणे अधर्म आहे, त्यातून परदारा हरण हे तर मोठें पाप आहे. तू पापी आहेस. तुझी तिन्ही लोकांत दुष्किर्ती झाली आहे. अंगद रागावलेला पाहून रावण घाबरला. राक्षस म्हणू लागले की हे तर मोठे संकट आहे. पहिल्या ने होळी केली आणि हा तर त्याहूनही बलवान वाटतो. राक्षस चळचळा