गीत रामायणा वरील विवेचन - 29 - मज आणून द्या तो हरीण अयोध्या नाथा

  • 2.7k
  • 981

शूर्पणखा रावणाच्या मनात सीतेबद्दल मोह निर्माण करण्यात यशस्वी ठरली. सीतेचे हरण करण्यासाठी रावणाने मारीच राक्षस जो रावणाचा मामाच होता त्याची मदत घेण्याचे ठरवले. विश्वामित्रांच्या यज्ञाच्या वेळेस जो पराक्रम श्रीराम लक्ष्मणांनी दाखवला होता तो मारीच विसरला नव्हता त्यामुळे त्याने रावणाला रामाशी युद्ध करण्याऐवजी हा विचार सोडून द्यावा असे सुचवले. "मारीच! शूर्पणखेचा अवमान तो आपला अवमान त्यासाठी मला रामाला अद्दल घडवायची आहे. तसेच रामाची पत्नी सीता तिच्या स्वयंवरच्या वेळेस तो धनुष्य माझ्या छातीवर पडला असता सगळे माझ्यावर तेव्हा हसले होते त्याचाही मला वचपा काढायचा आहे. ",रावण"रावण! मला वाटते तू महान राजा आहे असे परस्त्री मागे वेळ घालवणे तुला शोभत नाही. तसेच सीता