गीत रामायणा वरील विवेचन - 30 - याचका, थांबू नको दारात

  • 1.5k
  • 549

जानकी देवींच्या हट्टामुळे श्रीराम चाप बाण घेऊन मृगाच्या शोधात कुटीबाहेर पडतात. लक्ष्मण अंगणात व सीता देवी घरात मुगाची वाट बघत उभ्या असतात. सीता देवी फार उत्साहित झाल्या असतात. आता ते सुवर्ण मृग नाथ आणतील. त्याच्या पायात मी घुंगरू बांधेन व ते हरीण कुटीमध्ये हिंडू बागडू लागेल तेव्हा किती अद्भुत दृश्य दिसेल ह्याची कल्पना करून सीता देवी रोमांचित होत होत्या परंतु बराच वेळ होऊनहीश्रीराम येण्याचे चिन्ह दिसेना तेव्हा त्या चिंतीत झाल्या व सारख्या कुटीच्या आत बाहेर येरझारा घालू लागल्या. इकडे लक्ष्मण सुद्धा अंगणात उभे राहून श्रीरामांची वाट बघू लागले. तेवढ्यात त्यांना "सीते धाव! लक्ष्मणा धाव!" अशी आर्त हाक ऐकू आली. ती