गीत रामायणा वरील विवेचन - 31 - कोठे सीता जनकनंदीनी

  • 2.9k
  • 1.2k

तिकडे श्रीराम सुवर्णमृगाच्या रूपातील मारीचाचा वध करून परतत असताना त्यांना वाटेत लक्ष्मण येताना दिसतात. त्यांना बघताच त्यांच्या छातीत चर्रर्रर्र होते. त्यांचा डावा डोळा फडफडू लागतो ते लक्ष्मणास घाईघाईने म्हणतात,"लक्ष्मणा! तू इथे कसा? तिथे जानकी ला एकटं असुरक्षित ठेवून तू इथे का आला? त्या मायावी राक्षसाने माझा हुबेहूब काढलेला आवाज ऐकून तू इथे आला आहेस का?""हो! सीता देवींनी मला आग्रह करकरून पाठवलं. मी त्यांना समजावलं की भ्राताश्रींना काहीही होणार नाही पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. त्यांनी मला नाही नाही ते दूषणं दिले म्हणून मला नाईलाजाने यावं लागलं. " (इथे उगीच वाटून जाते की जर लक्ष्मणांनी सीता देवीचं ऐकून कुटीबाहेर पडून थोडं