सायलेन्स प्लीज - प्रकरण 10

  • 4.5k
  • 2.8k

प्रकरण १० पाणिनी पटवर्धन, विहंग विरुध्द शेफाली या दाव्यातील कागदपत्रे तपासात होता तेव्हा सौम्या आत येऊन म्हणाली, “आर्या बाहेर आली आहे.ती सारखी रडत्ये, झटका आल्या सारखं करत्ये.मला नाही वाटलं की तिला बाहेर जास्त थांबवाव.” “ रडायचं कारण काय तिला?” पाणिनी म्हणाला. “ बहुदा तिच्या मामाला अटक केल्याचा धक्का तिला बसला असावा.” “ मला वाटत नाही तसं, त्याला अटक होईल याचा तिला अंदाज आला तेव्हा ती खंबीर पणे उभी होती.” पाणिनी म्हणाला “ तिच्यावर लक्ष ठेवा पण.म्हणजे जरा काळजीने बोला तिच्याशी नाहीतर काय होईल तिचं सांगता येणार नाही.” –सौम्या “ ठीक आहे सौम्या , पाठव तिला आत. आणि तू ही इथेच