सायलेन्स प्लीज - प्रकरण 11

  • 4.8k
  • 2.9k

प्रकरण ११ संध्याकाळ होत होती.मोठ्या कार्यालयीन इमारतीत ऑफिस बंद होताना चालू असते तशी गडबड ऐकू येत होती.पॅसेज मधे घरी जाण्याची घाई झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बुटाचे आवाज प्रतिध्वनित होत होते, मधेच लिफ्ट च्या दाराची उघड झाप होत होती. पाणिनी पटवर्धन हे सर्व शांत पणे ऐकत होता.पुढील अर्धातास हे सर्व आवाज एक एक करत विरळ होत गेले आणि पाठोपाठ हा आवाजाचा लोंढा जणू रस्त्यावर अवतरला.आता त्याचे स्वरूप बदलले होते.आता मोटारींचे इंजिन चालू झाल्याचे आणि हॉर्न चे कर्कश्य आवाज येऊ लागले. पाणिनी ला रोजची या आवाजाची सवय होती, त्यातूनही मन एकाग्र करायची त्याला सवय होती.अत्ता सुध्दा त्याच्या ऑफिस मधे तो येरझाऱ्या घालत विचार करीत