स्वप्नद्वार - 4

  • 4.9k
  • 2.9k

स्वप्नद्वार ( भाग 4) "काय आहे स्वप्नांची नियमावली " डोळे मोठे करून निशांत विचारू लागला. " नियम क्रमांक एक.. कुठलाही मनुष्य हा फक्त दोनदाच त्याच्या स्वप्नदुनियेत जाऊ शकतो. नियम क्रमांक दोन.. स्वप्नदुनियेत जाण्याचा काही विशिष्ट कालावधी आहे. तो फक्त तेवढा वेळच त्या जगात राहू शकतो ". " बस एवढेच नियम " निशांत स्मितहास्य देऊन म्हणाला. " नाही आणखी पूर्ण ऐक.... जेव्हा तू स्वप्नदुनियेत जाशील तेव्हा तुझी संपूर्ण शक्ती, ज्ञानेंद्रिये, स्पर्शज्ञान सर्व काही त्या स्वप्नदुनियेत घेऊन जाशील. इथे तेवढं वेळ तुझं शरीर मेणाच्या पुतळ्यासारख होईल. ज्यात कुठलीही शक्ती, स्पर्शज्ञान नसेल. नाळीद्वारे चालणारा श्वास आणि धडकणार हृदय हा फक्त तुमच्या दोघात जोडणारा