मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 3

  • 6.8k
  • 4.6k

  पानं  ३            मला तर आता काय करू सुचत नव्हतं . खूप रडायला येत  होत . आता हे लिहिताना काय वाटत नाहीये . पण , तेव्हा माझ्यावर आलेल मोठं संकट वाटलं होत. धनश्री     (माझी मैत्रीण) मला म्हणाली , मी थांबते इथेच तू लगेच घेऊन ये चष्मा . मी लगेच जाऊन चष्मा घेऊन आले . मग आम्ही नेमून दिलेल्या वर्गात बसलो . म्हणजे आमच्या    Admission च्या पावतीवर क्लास आणि Division दिलेली होती . धनश्री आणि मी एकाच वर्गात होतो . तेव्हा आमचं सेमीच च ऍडमिशन झालं नव्हतं. आम्ही दोघी  एकत्र बसलो .         नंतर  आमची  एक  नवीन  मैत्रीण झाली , लक्ष्मी . ती सेमीची Exam द्यायला आली होती , त्या दिवशी . पण , आमची त्या दिवशी Exam झालीच नाही , दुसऱ्या दिवशी झाली . खरं म्हणजे , मला सेमी ला ऍडमिशन नकोच होत . म्हणून , मला ती सेमीची Exam पण द्यायची नव्हती . मी पहिली ते चौथी मराठी