जटायूचे दहन करून श्रीराम व लक्ष्मण पुढे निघाले.वाटेत त्यांना डोके नसलेला कबंध राक्षस भेटला.त्याने श्रीरामांनी सांगितले,"हे श्रीराम आपल्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. इंद्राने दिलेल्या शापामुळे माझी ही अवस्था आहे. माझ्या दोन्ही भुजा तुम्ही जर तोडल्या आणि मला मारून माझे दहन केले तर मी ह्या राक्षस जन्मातून मुक्त होईल.",त्यावर श्रीराम त्याला म्हणतात,"मी माझ्या भार्येच्या शोधात आहे. त्याबद्दल तू मला काही माहिती देऊ शकतो का?",त्यावर कबंध म्हणतो,"त्यासाठी आपणाला माझे दहन करावे लागेल. त्यानंतर च मी काही सांगू शकेन"श्रीराम त्याची इच्छा पूर्ण करतात. जेव्हा त्याचे दहन होते तेव्हा त्या अग्नितून दिव्य शरीर धारण करून तो कबंध राक्षस प्रकट होतो व सांगतो,"किष्किंधा नगरीत