गीत रामायणा वरील विवेचन - 37 - असा हा एकच श्री हनुमान

  • 1.1k
  • 294

वालीच्या वधानंतर त्याच्या क्रियाकर्मानंतर श्रीरामांनी सुग्रीवाला राज्यपदी बसवले आणि अंगदाला युवराज पदी बसवले. सत्ता प्राप्त झाल्यावर भोगविलासात रममाण होऊन सुग्रीव सीता देवींना शोधण्याचे श्रीरामांना दिलेले वचन विसरला(आपले राजकारणी करतात अगदी तसंच) ते पाहून श्रीरामांना संताप आला त्यांनी लक्ष्मणाला सुग्रीवाची कान उघडणी करण्यास पाठविले. लक्ष्मणांनी खरमरीत शब्दात सुनावल्या वर सुग्रीव भोगविलासाच्या धुंदीतून बाहेर आला आणि त्याने कोट्यवधी वानरसेनेला आमंत्रित केले आणि आठही दिशांना पाठवले. त्यापैकी दक्षिण दिशेला गेलेल्या गटात हनुमान जांबुवंत नल-निल तसेच अंगद समाविष्ट होते. त्यांनी एक महिना शोध घेतला पण सीता माईंचा कुठेही पत्ता लागला नाही. तेव्हा ते सगळे निराश झाले. तेव्हा त्यांना समुद्र तटावर एक संपाती नामक गरुड